भोकरदन तालुका

हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाशहॉटेल प्रकाशगडमध्ये पोलिसांची कारवाई, व्यवस्थापकाला अटक

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन-जालना रोडवरील केदारखेडाजवळ जवखेडा ठोंबरे शिवारातील हॉटेल प्रकाशगडमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला. या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून, व्यवस्थापक अशोक राऊत याला अटक केली आहे. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

हॉटेल प्रकाशगड येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाला पाठवत खात्री केली. यावेळी हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी वेश्या व्यवसायासाठी महिलांना बोलावून घेतले. हॉटेल मालक, व्यवस्थापक व कर्मचारी संगनमताने आर्थिक फायद्यासाठी हा धंदा चालवत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी हॉटेलमालक प्रकाश ठोंबरेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. छाप्यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. न्यायालयाच्या आदेशाने दोघींची जालना येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई विभागीय पोलीस अधीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, सहायक पोलीस निरीक्षक राजाराम तडवी , जमादार बावस्कर, पोलीस नाईक जैवाळ, अनिल सवडे, अरुण वाघ, अभिजित वायकोस यांच्या पथकाने केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!