भोकरदन तालुका

भोकरदन येथे तालुका काँग्रेसच्या वतीने ओबीसींचे आरक्षण संपवणा-या मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन येथे दि.२६ जुन रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तालुका काँग्रेसच्या वतीने ओबीसींचे आरक्षण संपवणा-या मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी संविधान रक्षणाची शपथ ही घेण्यात आली.


वेळीच जर तत्कालीन फडणवीस सरकारने योग्य पाऊल उचलले असते तर आज ओबीसींवर असा अन्याय झाला नसता असे प्रतिपादन यावेळी तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष त्र्यंबक अप्पा पाबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष त्र्यंबक अप्पा पाबळे,सलिम काझी हसनाबादकर,शालीकराम गावंडे,भाऊसाहेब दादा सोळूंखे,विश्वासराव वाघ,शाहीर गुलाबराव नळणीकर,शाहीर तळेकर,श्रावण आक्से,नगरसेवक संतोष अन्नदाते,नगरसेवक रमेश जाधव,प्रा.सोपान सपकाळ,विशाल गाढे,जहिर शेख,किशोर शिंदे,महेश दसपुते,विष्णू भालेराव,आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!