घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शेतकरी हितासाठी हे कायदे बदला ! अखिल भारतीय किसान सभा (लालबावटा)…

राजाटाकळी ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर.

घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे बदलण्याच्या मागणी साठी धरणे आंदोलन करण्यात आले.

तोट्यात असलेली शेती आणि शेतकऱ्यांची व्यवस्था केवळ अनुदान आणि सवलतीने दूर होणार नाही त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे मोडीत काढावे लागतील. देशाचे अर्थचक्र बदललेले आहे एकीकडे सत्ताधारी देशाला 5 ट्रिलियन इकॉनोमी बनविण्याच्या घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे अर्थव्यवस्था मंदी कडे असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. देशातील अर्थव्यवस्था नीट व सोयीचे करायची असेल तर भारतामध्ये निम्म्याहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह चे साधन शेती आहे याकडे दुर्लक्ष करून कसे चालणार.
शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती आणि परवडण्या जोगी सकस अन्नाची उपलब्धता देशापुढील मोठी आव्हाने आहेत. शेती व शेतकऱ्याची सुधारणा झाली तरच देश सुजलाम सुफलाम होईल शेतकरी विरोधी कठोर कायदे शेत जमीन धारण कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा या कायद्या विरुद्ध राजा टाकळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा लालबावटा जालना जिल्हा वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी वाचवा देश वाचवा,कामगार वाचवा,सविधान वाचवा या आंदोलनाचा एक हिस्सा हे आंदोलन करण्यात आले. देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळराजे आर्द्ड,जनार्धन भोरे,दिगंबर मोरे,कुलदीप आर्द्ड,शिवाजी तौर, महादेव सोळंके,आदी

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!