संपादकीय

मदत लोकांसाठी करा,फोटोंसाठी नाही !!!I

कोरोनाच्या लढाईतील पत्रकारही एक योद्धा

जालना न्युज संपादक

राज्यातील काही जिल्ह्यात मदत वाटपाचे फोटो काढल्यास कारवाई; चमकोंना लगाम..!!

संपादकीय-

लॉकडाउनच्या काळात गरजवंताना फूड पॅकेट, किराणा किटस्, सॅनिटायझर, मास्क आदींची मदत करतानाचे फोटो काढून प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर टाकल्यास प्रसिद्धीची अपेक्षा करणाऱ्या ‘प्रसिद्धी पिपासूना’ चांगलेच महागात पडणार आहे. मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटपाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास फोटातील सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असे आदेशच आता काही जिल्ह्यात काढले आहेत. त्यात जालन्याचा समावेश अद्याप तरी नाही.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या हातावर पोट असलेले व परराज्यातून परजिल्ह्यातून आलेले गरजवंतांसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्थां व दानशूर अखंडपणे कार्य करीत आहेत.
प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनि तर कम्युनिटी कीचनच्य माध्यमातून गरजवंताच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व निवारा केंद्राच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केल्या जात आहे.सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे.मात्र काही अपवाद वगळता ही मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वत:ची प्रसिद्धी केली जात आहे.त्यामुळे मदतकार्याच्या आडून स्वत:ची प्रसिद्धी करून घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अनेक जिल्ह्यात प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमात फोटो टाकणाऱ्यावर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत .

‘वो अपनी मदत को भी इस तरहा जताते है,
दो केले बाटते है,और दस फोटो निकालते है !!”

‘एका हाताचे दुसऱ्या हाताला कळू नये’ त्याला मदत म्हणतात.मात्र आज मदत करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे.सर्वच असे करत असतील असेही नाही काही लोक तर मदत करताना कुठलाही फोटो किंवा नामोल्लेख न करता थेट गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे अखंड काम करीत आहेत.
मात्र एक किलो साखरेची मदत करताना चार लोक फोटो काढत असतील तर मदत स्वीकारणाऱ्याला आपण गरजवंत आहोत की ‘भिकारी’ हा प्रश्न निर्माण होतो मात्र अशाकाळात तो सांगणार तरी कुणाला? सध्या तर मदत करून आपले फोटो समाजमाध्यमात प्रकाशित करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे.त्याचा प्रत्यय फेसबुक,व्हाट्सअप पाहले की नक्कीच येतो पण जे खरोखर मदत करतात त्यांना मात्र फोटो ची गरज नसते हे ही तितकेच महत्वाचे

//कोरोनाच्या लढाईतील पत्रकारही एक योद्धा ///

सद्या तथाकथित स्वयंसेवी,समाजसेवक कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्यासाठी सॅनिटायझर ,मास्क व साधनांचे वाटप करतानचे फोटो माध्यमांना पाठवून बातमी छापायची अपेक्षा करीत आहेत.परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कुणालाही पत्रकार या लढाईचा शिपाई आहे याची आठवणही झालेली नाही.डॉक्टर्स,नर्स,पोलीस व ईतर घटकांप्रमाणेच पत्रकार बांधवसुद्धा अखंडपणे आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देत आहेत.

‘जरूरत भी आज-कल खूब हँसी उड़ाई जाती है,
एक रोटी देकर दस तस्वीरे खिचाई जाती है !!!

कमाल तर तेंव्हा वाटते जेंव्हा ‘छटाकभर काम आणि किलोभर प्रसिद्धी’चा हव्यास असणारे
प्रति व्यक्ती एक चम्मच खिचडी वाटप करण्याचे चार फोटो पाठवत माध्यमांकडून बातमीची अपेक्षा करतात.’कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन’ सध्या हे वातावरण प्रसिद्धीची स्पर्धा लागलेल्यासाठी खूपच पोषक आहे.कुठं अन्नदान, फळ वाटप,अन्नधान्य वाटप, मास्क वाटप अशा एक ना अनेक निमित्ताने प्रसिद्धीचा संसर्ग कोरोनापेक्षाही वेगाने वाढतोय.कुणाचं काहीही होवो, ‘आम्ही जे काही करु त्याची फोटो- बातमी कराच’, असा अट्टाहास करणाऱ्याना सूदबुद्धी मिळो.म्हणूनच अनेक जिल्ह्यात अशी ‘चमकोगिरी’ करणाऱ्यावर चाप बसावा या उद्देशाने माध्यमांवर मदतीचे फोटो अपलोड करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना मात्र मानाचा मुजरा ….

संपादक ।जालना न्यूज

दिगंबर गुजर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक