बीड जिल्हा

सूर्यकांत भाऊ कांबळे यांच्या हस्ते मल्हार आर्मी संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनाचे आयोजन

बीड प्रतिनिधी / गोपाल चव्हाण

images (60)
images (60)

महाराष्ट्रात मल्हार आर्मी संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करणारे उद्योजक सूर्यकांत सुरेश भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष मल्हार आर्मी यांच्या हस्ते गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मल्हार आर्मी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे

सविस्तर असे की जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे २७ जुन रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान मल्हार आर्मी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन सूर्यकांत सुरेश भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध उद्योजक छत्रपती उद्योगसमूहाचे संस्थापक संतोष नाना भंडारी, मल्हार युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर विष्णू दादा देवकते, नगरसेवक तुकाराम येवले, जि प सभापती बाळासाहेब मस्के, दत्ताभाऊ पिसाळ, विलास नेमाने, गजानन भाऊ काळे, मंगेश चोरमले, अशोक ढोणे यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती अर्धमसला मल्हार आर्मी शाखा अध्यक्ष अशोक धापसे अंगत मैद, विठ्ठल ढवारे, बंडू धापसे, किरण खरात ,अनिल काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!