बीड जिल्हा

माजी राज्यमंत्री आ.सुरेश धस यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आयोजित बीड येथील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाल भैया चव्हाण.

बीड प्रतिनिधी

images (60)
images (60)

भाजपाच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळेच रद्द झाले आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चाचे आयोजन केले आहे तरी सोमवारी निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते गोपाल भैया चव्हाण यांनी केले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव व परिसरातील नागरिकांना मराठा आरक्षण प्रश्न माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी युवा नेते गोपाल भैया चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रात आघाडी चे सरकार आले आणि मराठा समाजाला आमच्या भाजप सरकारने दिलेले आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे त्या मुळे सर्व सामान्य जनतेत आघाडी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत तरी माजी राज्यमंत्री आ. सुरेश आण्णा धस यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते गोपाल भैया चव्हाण, किरण शिंदे महेश मस्के, अशोक तौ, भारत तौर, आकाश चव्हाण सुभाष जाधव सचिन लव्हाळे, बाळासाहेब पवार, बाळू तौर, देवराज कोळे, आदींनी केले आहे

मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवार २८ जुन रोजी बीड येथे होणाऱ्या मोर्चा आंदोलनाच्या तयारी संदर्भात गेवराई येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या संप र्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली मराठा आरक्षण पिक विमा ओबीसी आरक्षण व इतर मागण्या संदर्भात भाजपाचे आमदार तथा माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांनी आक्रमक भूमिका घेतली असुन सोमवारी बीड येथे मोर्चा आंदोलनाला जास्तीत जास्त गेवराई तालुक्यातून मराठा बांधव व संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुरेश आण्णा धस व तसेच गेवराई चे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांनी बैठकीत प्रसंगी केले आहे
यावेळी बैठकीला सभापती दिपक सुरवसे, मा सभापती सतीश बप्पा पवार ,मा जि प सदस्य सुरेशराव हत्ते. नगराध्यक्ष सुनील जवंजाळ , राजेंद्र राक्षसभुवनकर,राहुल जिजा खंडागळे, सतिश दाभाडे, दादासाहेब गिरी, ईश्वर पवार, शाम आबा कुंड, आप्पासाहेब कानगुडे, गोपाल भैया चव्हाण, समाधान जिजा मस्के, अमोल मस्के ,बाबा खरात, सय्याजी पवार,बडू बारगजे, विठ्ठल मोटे अमोल मस्के, संजय इगळे,शिवाजी काळे, योगेश मोटे, गोरख मोटे, शेषराव तौर, लक्ष्मण चव्हाण, आदी उपस्थित होते यावेळी समाधान मस्के यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्रस्तावीक बाबाराजे खराद यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!