भोकरदन तालुका

सोयगाव देवी येथिल कमी उंचीच्या पुलामुळे तासभरासाठी संपर्क तुटला

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यात दि.२८ जुन रोजी ३ वाजेच्या दरम्यान २ तास जोरदार पाऊस झाला, अनेक गावात कमी उंचीच्या पुलांमुळे नेहमीच संपर्क तुटतो,या पुलांच्या बंब्यात पहिल्या पाऊसात घान जावुन अटकते आणि या पुलाचे नळकांडे जाम होतात व नंतर या पुलांवरुन पाणी वाहते आणि गावांचा संपर्क तुटतो,असेच प्रकरण आज सोयगाव देवी येथिल पुलावर घडले सोमवारी ३ वाजता झालेल्या पाऊसामुळे ओड्याला मोठ्या प्रमाणात पुर आला आणि या सोबत गाडी कचरे वाहुन आले आणि या पुलात येवुन आडकले यामुळे जवळपास तासभर गावाशी संपर्क तुटला होता.

गावातील आमोल राऊत,समाधान सहाने या युवकांनी पुलावर अडकलेले कचरा आणि गाड्या बाजुला करुन पाणी मोकळे केले आणि अडकलेल्या नागरीकांना पुलांवरुन येण्यासाठी मदत केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!