ब्रेकिंग: रावसाहेब दानवेंचे मंत्रिपद कायम.
प्रकाश जावडेकरांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा, रावसाहेब दानवेंचे मंत्रिपद कायम
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होत असताना महाराष्ट्रातील केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची जोरदार चर्चा होती . मात्र , आता त्यावर पडदा पडला असून दानवे यांचे मंत्रिपद सुरक्षित राहिले आहे . राज्यातील संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे . दरम्यान , मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांना स्थान मिळाले आहे . ( State Minister Raosaheb Danve still in Union Cabinet ) ) |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे .
दानवे यांच्यासह संजय धोत्रे यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती . पण अखेर त्यावर पडदा पडला आहे . दानवे यांचा राजीनामा मागण्यात आलेला नाही , हे अखेर सायंकाळी स्पष्ट झालं . राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारलेल्या मंत्र्यांच्या यादीत दानवे यांचे नाव नाही . धोत्रे आणि जावडेकर यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे .
धोत्रे आणि जावडेकर यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे . त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत असताना झालेल्या बदलांच्या वावटळीत आपलं मंत्रिपद टिकवण्यात दानवे यांना यश आल्याचं दिसतं . दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा ( Union Cabinet ) मेगाविस्तार केला जाणार आहे . महाराष्ट्रातील चौघांसह एकूण 43 जणांचा शपथविधी आज होणार आहे . या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये नारायण राणे , भारती पवार , भागवत कराड आणि कपिल पाटील या चौघांचा समावेश आहे . तसेच जोतिरादित्य शिंदे , सर्वानंद सोनोवाल , अनुराग ठाकूर , किरण रिजिजू , हरदीप सिंग पुरी यांच्यासह काही नव्या – जून्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे . आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी कालपासून जवळपास 10 हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे . त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ . हर्ष वर्धन , शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक , केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार , केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे . त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली . दरम्यान , कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती . तसेच काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत . त्यामध्ये हरदीप सिंग पुरी , किरण रिजिजू , अनुराग ठाकूर आदींचा समावेश आहे . अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे
दिसते . आज 43 जणांचा शपथविधी होणार असून त्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे .
हे घेणार आज शपथ : 1. नारायण राणे ( महाराष्ट्र ) , 2. सर्वानंद सोनोवाल , 3. डॉ . विरेंद्र कुमार 4. जोतिरादित्य शिंदे , 5. रामचंद्र प्रसाद सिंग , 6. अश्विनी वैष्णव 7. पशुपती कुमार पारस , 8. किरण रिजिजू , 9. राज कुमार सिंग 10. हरदिप सिंग पुरी , 11. मनसुख मांडलीय , 12. भूपेंद्र यादव 13. पुरषोत्तम रुपाला , 14. अनुराग ठाकूर , 15. पंकज चौधरी 17. अनुप्रिया सिंग पटेल , 18. डॉ . सत्यपाल सिंग बघेल , 19 . राजीव चंद्रशेखर 20. शोभा करंदालजे , 21. भानू प्रताप सिंग वर्मा , 22. दर्शना विक्रम जरदोश 23. मिनाक्षी लेखी , 24. अन्नपुर्णा देवी , 25. ए . नारायणस्वामी 26. कौशल किशोर , 27. अजय भट , 28. बी . एल . वर्मा , 29 . अजय कुमार 30. देवुसिंह चौहान , 31. भगवंत खुबा , 32. कपिल पाटील ( महाराष्ट्र ) 33. प्रतिमा भौमिक , 34. डॉ . सुभाश सरकार , 35. डॉ . भागवत कराड ( महाराष्ट्र ) 36. डॉ . राजकुमार रंजन सिंग , 37. डॉ . भारती पवार ( महाराष्ट्र ) 38. बिश्वेश्वर टुडू , 39. शंतनू ठाकूर , 40. डॉ . मुंजापरा महेंद्रभाई 41. जॉन बारला , 42. डॉ . एल . मुरूगन , 43. निसिथ प्ररमाणिक