परतूर तालुका

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न


दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची जिल्हा स्तरीय आढावा बैठक नुकतीच परतुर येथे रमेश लालझरे यांच्या निवास स्थानी मराठवाडा अध्यक्ष उत्तमराव अंबिलढगे यांच्या अध्येक्षेतेखाली संपन्न झाली. या बैठकीत कलावंतांच्या विविध समस्यां, प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मागील काळापासून मनोरंजनात्मक सर्व कार्यक्रम जसे लग्न साहळे,जागरण गोंधळ ,डोबांरी खेळवाले ,वाघ्या मुरुळी ,तमाशे व अनेक स्वरुपाची कार्यक्रम बंद असून लाँकडाऊनमुळे कलावंतावर फार मोठी बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेले आहे म्हणून शासनाने सर्व कलावंतांना मदत करावी व कलावंतांच्या विविध समस्या जाणून घेऊन सोडवव्यात.असे मराठावाडा अध्यक्ष उत्तमराव अंबिल ढगे यांनी अध्यक्षीय समारोपात आपले मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र कलावंत न्याय ह्क्क समितीच्या मागे कलावतांनी खंबीरपणे उभे राहावे तसेच ९ आँगष्ट क्रांती दिनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर कलावंताच्या विविध मागण्या संदर्भात मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यास जास्तीत जास्त कलावंतानी उपस्थित राहवे.असेही शेवटी आंबिलढगे यांनी कलावंताना आव्हान केले. या बैठकीस महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे मराठवाडा अध्यक्ष उत्तमराव आंबील ढगे , मराठवाडा उपाध्यक्ष बाबनभाई अत्तार ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष लालाभाई पडूळ , जालना जिल्हा अध्यक्ष बलभिम ठोंबरे , जालना जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भिसे ,जालना तालुका अध्यक्ष यशवंत घोडे ,बदनापूर तालुका अध्यक्ष सुरेश अरसूड व तालुक्यातील आदी कलावंत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परतुर तालुका अध्यक्ष दिपक हिवाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार केशव थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष रमेश लालझरे , सुरेश साबळे,फत्तुभाई सातोनकर,बिडवे,दिनेश हिवाळे,गणेश लालझरे ,व आदी कलावंतानी विशेष परिश्रम घेतले.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!