परतूर तालुका

आंबेडकरनगर येथे लसीकरण शिबीर

images (60)
images (60)

ll छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था,ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांचा संयुक्त उपक्रम ll

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

परतूर शहरातील आंबेडकर नगर येथे उद्या मंगळवारी (दि.१३) छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था,ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर नवल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाहेद सय्यद,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते द.या.काटे उपस्थित राहणार आहे.
आंबेडकरनगर व परिसरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नवल,डॉ.सय्यद,डॉ.तारे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.


आंबेडकर नगरमधील समाज मंदिराजळ सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित केलेल्या या शिबिरात लस घेण्यासाठी येतांना जेवण करून यावे तसेच सोबत आधार कार्ड, मोबाईल आणावा असे आवाहन शिबिराचे आयोजक अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!