भोकरदन तालुका

वालसा डा.येथे तलाठ्याच्या उपस्थितीत अवैद्य रित्या साठवलेल्या वाळुचा ग्रामस्थांनी केली पंचनामा

महसुल विभागाने तात्काळ कारवाई करावी नसता अंदोलनाचा इशारा

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासुन वाळु माफीयांनी वाळुचे अनेक ठिकाणी साठे करुन ठेवले असुन ते आता अव्वाच्या सव्वा दराने विकत असुन,तालुक्यातील वालसा डावरगांव येथिल ग्रामस्थांनी तलाठ्याच्या उपस्थितीत अवैद्य रित्या साठवलेल्या वाळुचा पंचनामा केला आहे.

भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव शिवारातील गट क्र. 13 मधिल सरकारी गायरान मध्ये वेतुळबा जवळ पुर्णा नदी पत्रातून अवैधरित्या वाळू चोरी करून अंदाजे 10 ते 12 ब्रास रेती हि रात्री बे अपरात्री चोरी करून सरकारी गायरानामध्ये आणुन साठा करून ठेवलेली आढळून आले आहे . सदर वाळू साठे हे कोनी केले . अशी पंचनामा करणार्यां ग्रामस्थांना तलाठी अरविंद उर्फाटे यांनी विचारणा केली असता पंचानी सगितले की . सदर वाळू ही अज्ञात व्यक्तीने अवैध्यरीत्या पूर्णा नदी पात्रातून रात्री अपरात्री वाळू चोरुन साठे केल्याचे सांगितले.करिता आम्ही पंच्यांनी प्रतेक्ष त्या मोक्यवर जाऊण पंचनामा लिहून दिला जो खरा व सत्य असुन आम्हा पंच्याना मान्य आहे.असे या पंचनाम्यात नमुद करण्यात आले असुन ,आता या व अशा अनेक ठिकाणी असलेल्या वाळु साठ्यांवर महसुल विभाग कारवाई करणार की गप बसणार हे पाहाणे आता आवाक्याचे ठरणार आहे.

या पंचनाम्यावर गावातील समाधान सुखदेव वाघ ( सरपंच), कैलास नायबराव वाघ,वैभव दिलीप वाघ, शिवाजी प्रभत वाघ, समाधान नारायण वाघ, राधाकिसन नायबराव जाधव , सुनिल गोविंदा साळवे , सजय अंबादास साळवे ,गणेश जनार्दन सोदागर , गजानन सोनाजी सोदागर , भारत दादाराव येशवते ,दत्तू भाऊ वाघ अदिसह ग्रामस्थांच्या साक्षर्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!