ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट, या गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकुळ
मधुकर सहाने : भोकरदन
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत थोडासा विरंगुळा म्हणून जवळजवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर सर्रास अॅक्टिव्ह आहेत. अशातच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक गाण्यांचाही समावेश आहे. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या स्टेटसवर आपल्याला पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवलं जात आहे.तसेच काहींनी तर तुम्ही नादत केला शेठ,तेवढी उधारी द्या शेठ,किती दिवस शेठ,तुम्ही माणुस आहात लय ग्रेट,पण उधारी द्या ना शेठ स्टेटस तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकंदरीत, सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर कोरोनाची कमी पण ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ने मात्र धुमाकूळ घातला आहे.हे गाणं गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या एवढी क्रेझ आहे की, प्रत्येकाचा स्टेटसला हेच गाणे वाजत आहे.