भोकरदन शहरात गाय चोरीच्या घटनांमध्ये वाढ,पोलिस प्रशासनाला चोरट्यांचे आव्हान
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरात गेल्या काही दिवसांपासून गाय चोरीच्या घटना वाढत आहेत. शहरातील अनेक भागातुन तस्करांनी गायी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी आणि गौ पालकांना गौ तस्करांनी मोठा धक्का द्यायला सुरुवात केली आहे. भोकरदन शहरातील काॅलनीमधुन मध्यरात्रीनंतर शेतकऱ्यांच्या अंगणातील गायी चोरण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत.शहरातील गौ प्रेमी महेश पौरोहीत,रोशन देशमुख,सिद्दीक कादरी यांच्या गायी चोरीला गेल्या आहेत आणि यांनी पोलिसस्टेशनला तक्रारही दाखल केली पण आजुनही या चोरांचा पोलिसांना सुगावा लागला नसल्याने पोलिस व चोरात काही संगमत तर नाही ना अशी नागरीकात चर्चा होत आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे शेतकरी, गौपालक सर्वांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यावर आता घराच्या अंगणातून दुधारू पशु चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.