जालना तालुका

बेरोजगार तरुणांनो सद्या रोजगाराच्या नादी लागण्याची वेळ

महारष्ट्रातील युवकांनो संधीचे सोने करा-शरद सोनुने

_ जालना तालुका न्यूज / बबनराव वाघ

सध्या सर्वत्र लॉकडाउन असून यामुळे बाहेर राज्यातील छोटछोटे व्यवसायिक हे जे च्या तेच्या राज्यात परतले आहे . व महाराष्ट्र अनेक तरून हे बेरोजगार आहेत याचा फायदा घेत महारष्ट्रातील तरुनांनी याच संधीचा फायदा करून , पाककलेत परांगत व्हॉवे व व्यवसायात उतरावे असा सल्ला रामनगर येथील तरुण शरद सोनुने यांनी दिला आहे .

सद्या घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर,इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण, आज्जी यांच्या सारख्या पाककलेत परांगत आई बहीणींकडुन शिकून घ्या.यु पि,बिहारी परत यायच्या आत आपल्या पोराच्या हात गाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे. परत बोंबलू नका काम मिळत नाही म्हणून.दादा,आण्णा,भाऊ,आमचे काळीज असले नेते जरा तुमच्या राजकीय ताकतीचा वापर करून पोरांना गाडी लावायची परवानगी घेऊन द्या महापालिकेकडून.म्हणजे तुम्हाला पण तुमचा नेता तुमचा नेता कळुन जाईल.फक्त निवणुकीपूरता वापर करू नका पोरांचा,काम द्या.कार्यकर्त्यांनी पण थोडं स्वार्थी व्हा!इतके दिवस काम केले ना पक्षनेत्यांचे आता हक्काने जागा मागा वडापावची हातगाडी लावायला.अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. काम नाही म्हणुण आळस जोपासुन पाटीलकी गाजवन्या पेक्षा काम शोधा. घराची जिम्मेदारी उचलायला शिका. असा सल्ला दिला

शरद सोनुने – रामनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक