भोकरदन तालुका

पोलिस कर्मचारी गणेश पायघण यांची नाईक पदी व नाना म्हस्के यांची सहायक फौजदारपदी  पदोन्नती

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

जाफराबाद येथिल पोलिस स्टेशनला नेमनुकिस असलेले कर्मचारी गणेश पायघण यांना पोलीस नाईक पदी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोकरदन येथे नेमणूक असलेले नाना बापूराव म्हस्के यांना सहायक फौजदार पदी पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी पदोन्नती बाबतचे आदेश निर्गमीत केले होते.त्यानुसार भोकरदन येथे नव्याने पदभार घेतलेले पोलिस उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी गणेश पायघण व नाना म्हस्के यांना फीत व स्टार लावून पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

यावेळी असिफ शेख, सेवानिवृत्त पाटील पोलिस काॅस्टेबल संगिता खुटाळे, पोलिस नाईक रामेश्वर सिनकर,पोका निलेश फुसे ,एकनाथ वाघ गणपत बनसोडे होमगार्ड तन्वीर शेख हे हजर होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!