छञपती शिवरायांचा पुतळा नियोजीत जागीच उभारू – खा.संजय जाधव
शासन स्थरावर करणार सर्व बाबीची पुर्तता
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शासन स्थरावर बाबी पुर्तता करून साईनाथ मंदीर चौकातील छञपती शिवरायांचा पुतळा उभारू यासाठी येत्या पाच सहा दिवसात नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तसेच संबंधीत विभागाशी शिष्ठमंडळासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे परभणीचे खा.संजय जाधव यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले ते परतूर येथील मराठा क्रांती भवन येथील शिवस्मारका संदर्भात आयोजीत बैठकीत बोलत होते.यावेळी विचार पिठावर शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे,काँग्रेसचे युवा नेते नितीन जेथलिया,मनसेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश सोळंके,शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड,माधवराव मामा कदम,रमेशराव सोळंके,रामेश्वर आन्ना नळगे,आशोकराव आघाव,मंठा शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे,माजी सभापती वरकड,कमळकर सर,प्रदिप चव्हाण,महेश नळगे यावेळी उपस्थित होते.
काही दिवसापुर्वी परतूर येथील साईनाथ चौकातील छञपती शिवाजी महाराज पुतळाच्या नियोजीत फलकाच्या जागी शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाचे काम करणार्या एजन्सीने पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम चालु केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवभक्तांनी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या नेतुत्वाखाली भर पाऊसात आंदोलन करून काम बंद केले होते व फलक परत त्याठिकाणी बसवण्यात आला होता.या बैठकीचे सुञसंचालन अशोक तनपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संभाजी तिडके यांनी मानले.या बैठकीला तालुक्यातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते.