घनसावंगी तालुकाजालना क्राईम
जालना-घनसावंगी-माजलगाव मार्गे परळी रेल्वे मार्ग जोडण्यात यावा
घनसावंगी तालुका सर्वपक्षीय समितीची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
जालना, घनसावंगी, माजलगाव, ते परळी रेल्वे मार्ग हा मराठवाड्याच्या दृष्टीने दळणवळणासाठी महत्त्वाचा मार्ग आहे.हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात यावा यासाठी दिल्ली येथे आज दि.२९ गुरूवार रोजी घनसावंगी तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, नंदकुमार देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे देवनाथ जाधव सतीश केसकर रमेश बोबडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.