परतूर तालुका

इनामी जमिनीवर मेडीकल दुकान थाटणार्‍यावर कारवाई करा – ईम्रान कुरैशी

images (60)
images (60)

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

परतूर शहरालगत सर्वे नं. २८/६ ज्याचा गट नं. १३८ साईनाथ मंदीरासमोर सेलु रोड स्थित ईनामी जागेत अनाधिकृत कागदपत्रे जमा करुन मेडीकलचे दुकान थाटणाऱ्या चैतन्य मेडीकलचा परवाना रद्द करुन संबधित मालकावर कार्यवाही करण्याची मागणी इम्रान कुरैशी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतूर शहरा लगत सेलु रोड स्थित सर्वे नं. २८/६ ज्याचा गट नं. १३८ साईनाथ मंदीरासमोरील (बडा पंजेतन )ईनामी जागेची खोटी बोगस कागदपत्रे जमा करून चैतन्य मेडीकलसह अनेक व्यावसाईक दुकाने थाटण्यात आली आहेत. मेडीकलच्या मालकाने शासनाची दिशाभूल करत खोटा दस्ताऐवज तयार केला आहे हे असतांना त्यांना मेडीकलचा परवाना मिळालाच कसा आसा सवालही निवेदनात उपस्थित केला आहे. या प्रकराणात मोठा आर्थिक व्यवहार करुन संबंधीत कागदपत्रे गोळा केल्याचा आरोपही यात केला आहे. कागदपत्रे पडताळून संबधित मेडीकलचा परवाना रद्द करावा व जागा मालकावर कायदेशीर कार्यवाही करावी. नगर पालिकेनेही दुकान चालू करत असतांना त्यांना परवाना दिला कसा यातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावरही कार्यवाही करावी. ईनामी जमीनीत व्यवसाय करणे हा गुन्हा असून संबंधीत दोषीवर गुन्हा दाखल व्हावा. अशी मागणी इम्रान कुरेशी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!