मंठा तालुका

मंठा येथे भाजपा बूथ रचनाबाबत संघटनात्मक बैठक

मंठा / रमेश देशपांडे

images (60)
images (60)


भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वप्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारधारेवर हा पक्ष चालतो भूत रचनेच्या माध्यमातून नवनवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडून पक्षाला अधिकारी बळकटी देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

मंठा येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या बुथ रचना बाबत संघटनात्मक बैठकी प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर परतूर विधानसभा बूथ रचना प्रमुख तथा भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे भारतीय जनता पार्टीचे मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ जि प सदस्य पंजाबराव बोराडे शहराध्यक्ष प्रसाद बोराडे जिजाबाई जाधव दिलीप पवार नागेश घारे विठ्ठलराव काळे नाथराव काकडे दत्ता कांगणे अशोकराव डोके दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती

पक्षसंघटना मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाने आपले कौशल्य वापरून पक्षाची बुथ रचना मजबूत करावी लागते या रचनेच्या माध्यमातून गावपातळीवरील सर्वसमान्य व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचारधारा पोचविण्यास मदत होते याच बूथ रचनेच्या बळावर भारतीय जनता पार्टी जगातील प्रथम क्रमांकाची पार्टी बनली आहे चांगले लोक राजकारणाच्या प्रवाहात आले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून सर्वप्रथम देशाप्रती प्रेम पक्षाबद्दल आपलेपणाची भावना आणि त्यानंतर समर्पणाच्या भावनेतुन आपण स्वतः अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ठेवत असतो आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी जागतिक पातळीवर इतरांपेक्षा वेगळी “पार्टी विथ डिफरन्स” म्हणून आपली ओळख निर्माण करु शकली आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत त्या सर्व योजनांचा अधिकाधिक लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व भारतीय जनता पार्टी ही इतर पार्टी पेक्षा वेगळी आणि देशीहीत बघणारी आणि देशाप्रती समर्पणाची भावना असणारी पार्टी आहे ही बाब सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत रुजवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा असेही लोणीकर यावेळी म्हणाले

यावेळी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख शक्ती केंद्र प्रभारी पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!