शिवसेना नेत्याने स्वखर्चाने परतूर येथील बंद पडलेले बोअर (हातपंप) दुरुस्त करुन केले सुरु
वडारवाडी येथील नागरिकांनी मानले आभार
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील वडारवाडी येथील गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेले नगरपालिकेने दुर्लक्षित केलेले बोअर (हातपंप)शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते महोन अग्रवाल यांच्या स्वखर्च्याने वडारवाडी येथील गेल्या कित्येक वर्षानी बंद असलेले पाण्याचे बोअर (हातपंप) दुरुस्त करुन घेतले. हातपंप दुरुस्ती चे काम अग्रवाल यांनी स्वखर्चाने केले असून या प्रभाग क्रमांक 10 वडारवाडी मध्ये पावसाळ्यातही पाण्याचा मोठा दुष्काळ असून याठिकाणी पाण्याची कुठलीही शासकीय व्यवस्था नाही येथील नागरिकांना खूप दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. मोहन अग्रवाल यांनी वडारवाडी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नगरपालिकेने दुर्लक्षित केलेले कित्येक वर्षांनी बंद असलेले हातपंप आज अग्रवाल यांनी स्वखर्चाने सुरू करून घेतले.हातपंप सुरू केल्याबद्दल वडारवाडी येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले