भोकरदन तालुका

आव्हाना व सावखेडा गाव पूरग्रस्थांच्या मदतीसाठी सरसावले

टायगर ग्रुपच्या आव्हानाला मिळाला प्रतिसाद

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव, पै. निलेश भाऊ जाधव ,जालना जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ शिंदे, टायगर ग्रुप सिल्लोड तालुका अध्यक्ष  यांनी पुरग्रस्थांना मदतीसाठी आव्हाण केले होते,या आव्हानाला प्रतिसाद देत सावखेडा व आव्हाना गावातील नागरिकांनी धान्य, किराणा स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत केली.

भोकरदन तालुक्यातील सावखेडा व आव्हाना गावात केलेली मदत ही आज टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय सिल्लोड या ठिकाणी पोहोचवण्यात आली
2 दिवसात जमा झालेल्या धान्याची किट बनवुन ही मदत चिपळून ,कोकण पूरग्रस्तांना  पाठवण्यात येणार असल्याचे सिल्लोड तालुकाध्यक्ष शैलैश शिंदे यांनी सांगितले.

यावेळी टायगर ग्रुप आव्हाना येथिल सदस्य सुभाष पांढरे,सुनील गावंडे ,किशोर गावंडे ,राहुल गावडे ,अबरार शेख, पवन पांढरे, ज्ञानेश्वर ठाले ,गजानन मस्के ,
आकाश ठाले, अभिषेक गावंडे, सोमीनाथ दुधे ,अशोक सरोदे .व सावखेडा येथिल सांडु खरात,दत्तु जाधव,पुंडलिक जाधव,प्रदिप जाधव,ज्ञानेश्वर जाधव,बबन जाधव,बाळु जाधव,श्याम जाधव,रामेश्वर वाडेकर अदिंनी पुढाकार घेवुन मदत जमा करण्यासाठी सहकार्य केले.

भोकरदन तालुक्यातील सावखेडा येथिल टायगर ग्रुपच्या सदस्यांनी अशा प्रकारे घरोघरी जावुन मदत जमा केली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!