मंठा तालुका

सामाजिक बांधिलकी जपत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पूरग्रस्तांना दिला एक महिन्याचा पगार

फडणवीस सरकारच्या काळात मदतीवर टीका करणारे आज मदत न करता मुग गिळून गप्प आहेत – लोणीकर यांची आघाडी सरकारवर टीका.

मंठा /रमेश देशपांडे

images (60)
images (60)


राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा सह कोकण इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपला ०१ लाख ७५ हजार ९७३ रुपये पगार धनादेशाद्वारे थेट मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला आहे

कोल्हापूर सांगली सातारा सह कोकण परिसरात पुराचे प्रचंड मोठे थैमान माजले असून अनेक ठिकाणी पुराचे पाणी लोकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावे दरडीखाली दबले गेली आहेत पुराच्या या महाभयंकर संकटामुळे अनेकांचे उपजीविकेच्या साधनासह सर्वस्व हिरावून घेतले आहे अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टी चे सर्व आमदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देतील अशी सूचना आणि आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती त्यांच्या सूचनेनुसार परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये धनादेशाद्वारे आपली मदत सुपूर्द केली आहे

नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण सर्वांनी एकमेकांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे असून ज्यांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले आहे अशा लोकांना मदत व्हावी यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण समाजाचे देणे लागतो ही भावना प्रत्येकाने आपल्या मनात जपली पाहिजे भारतीय जनता पार्टी हा नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असून सत्तेत असताना सर्वाधिक मदत तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळेला केली आजही विरोधी पक्षात असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतरांकडून दिला जाणारा मदतीचा ओघ कमी झालेला नाही सत्ताधारी लोकप्रतिनिधीपेक्षा अधिक मदत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षाने केली आहे असा दावा देखील लोणीकर यांनी यावेळी केला

महाराष्ट्रातील विद्यमान विकास आघाडी सरकारने मदतीची घोषणाही केली नाही आणि मदत पोहोच देखील केले नाही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तात्काळ मदत पोहोचविण्यात आली होती त्यावेळेला टीका करणारे लोक आज मात्र काहीच मदत न करता परंतु त्यावर मूग गिळून गप्प आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी असून अशा संकटाच्या परिस्थितीत आपण सर्वांनी मोठ्या मनाने पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन देखील लोणीकर यांनी यावेळी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!