भोकरदन तालुका

दोघांच्या वादात तिसर्याचा खुन,जालना जिल्हातील भोकरदन येथिल घटना

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन येथे दोन मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली.खुन झालेल्या तरुणाचे नाव  सागर भारत बदर (वय 27) असुन तालुक्यातील वालसा खालसा येथिल रहिवाशी होता.  सागर बदर या तरुणाचे दिड महिण्यापुर्वीच  विवाह झाला होता .

या बाबत मिळालेली माहीती अशी की, गुरुवारी रात्री सागर बदर हा मित्र कैलास गजानन फुके रा . फत्तेपुर  याच्या लहान भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन – जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता . वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासला जुने वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला . आपल्यातील जुने वाद मिटून टाकू तू फत्तेपुर रोडवरील 132 केव्ही केंद्राजवळ ये असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले . कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून १३२ केव्ही केंद्र गाठले . आणि या ठिकाणी योगेशसोबत हनुमंत फुके देखील होता . यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली . मात्र , सागर व इतर मिञांनी भांडण मिटवले .यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला , त्याच्यामागे सागर बसण्यासाठी निघाला . याच दरम्यान योगेशने सागरच्या पोटात धारदार चाकु खुपसला . अचानक झालेल्या वारामुळे सागर बदर जागीच कोसळला . हे पाहताच योगेशने तेथून पळ काढला . कैलास व सोबत असलेल्या मिञांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .

रक्तस्त्राव जास्त होत असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्याला जालना येथे रेफर केले .पण जालना येथे पोहचण्यापूर्वीच रात्री 11 वाजेच्या दरम्यान सागरचा मृत्यू झाला . या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली असून खुण करणारा आरोपी माञ फरार असल्याचे कळते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!