परतूर शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी द्या – मोहन अग्रवाल यांची नगरविकास मंञ्याकडे मागणी
मुंबईत प्रत्येक्षात भेटून केली मागणी
दिपक हिवाळे/परतूर न्युज नेटवर्क
शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मोहन अग्रवाल यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराच्या विकास कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्षात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केलीआहे. परतुर शहराचा रखडलेला विकास पाहता शहरातील विविध भागात विकासकामा अभावी नागरिकां बेहाल होत असून शहरातील भुयार गटार योजनेमुळे गल्लोगलीत फुटलेले रस्ते स्वच्छतेचा आभाव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहर विकास कामासाठी 5 लाख रुपयाचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर यांची उपस्थिती होती.