बदनापूर तालुका

औतावरच्या शेतकर्‍यापर्यंत शेतीविषयक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान पोहचवणे काळाची गरज – फळबागतज्ञ डॉ. कापसे

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट.

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे ता. 05 गुरुवार रोजी नाथ अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर व अनुशेष फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.द्वारा आयोजीत अ‍ॅग्रो इंडिया शेती संघाचा 198 वा द्रवादश मेळावा गुरूवार (ता.5) झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, फळबाग तज्ञ तथा गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे, शास्त्रज्ञ तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.ठक्के, डॉ.एस.एस.बैनाडे, रिलायंस फ्रेशचे जनरल मॅनेजर दत्तात्रय मोरे, डॉ.डी.बी.कच्छवे, सत्तार खान जमालखान, तुळशीराम चंद, जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव घुगे, जि.प.सभापती जयप्रकाश चव्हाण, बदनापुर पं.स.सभापती बी.टी.शिंदे, उपसभापती जयप्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

images (60)
images (60)

शेतकरी सुखी व समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी शेतकर्‍यांनी पिढ्यानपिढ्याची शेती न करता नवनवीन प्रयोग करून – फळबागा लागवड करून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे व या शेतकरी मेळाव्यातून तज्ञांच्या ज्ञानाची शिदोरी घेवून त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करावा असे जि.प.अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी सांगितले.औतावरच्या शेतकर्‍यापर्यंत शेतीविषयक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान पोहचवणे आवश्यक आहे. त्या शिवाय शेती क्षेत्राचा विकास होणार नाही. शेत जमिनीचे घटते क्षेत्र चिंतेचा विषय आहे. कृषी विकासाला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदलाची आवश्यकता आहे. पिकामध्ये शेतकर्‍यांना सुधारित लागवडीचे तंत्र अंगीकारावे लागेल. या शिवाय उत्पादकता वाढीसाठी आवश्यक बाबी कराव्या लागतील असे मत फळबाग तज्ञ डॉ.भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले. कापूस तज्ञ डॉ.एस.एस.बैनाडे म्हणाले, आधुनिक शेतीला मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या हंगामी शेतीतील पिकांचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. कापुस, तूर, सोयाबीन यामध्ये उत्पादकता वाढीस सोबतच नफा मिळण्याचे गणित साधावे लागेल. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारतांना त्याला 75% जुन्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल वेळेवर पेरणी, खुरपनी, कोळपनी, खते देणे, झाडांची संख्या वाढविणे व साध्या बाबी अवलंबुनही हंगामी पिकामध्ये उत्पादकता वाढवता येवू शकते. डॉ.एस.बी.पवार म्हणाले शाश्वत पाण्याच्या सोईशिवाय फळबागेचा विचारच करायला नको. जालना कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब घुगे म्हणाले यापुढे शेतकर्‍यांना जर आर्थिक उन्नती साधायची असेल तर दिवर्सेदिवस करत असलेल्या पारंपारीक शेतीला फाटा देवून केशर आंबा, बहाडोळी जांभुळ, मोसंबी, खजूर, सिताफळ, पेरू सारख्या फळबागेबरोबर किंवा एक एकर तरी शेतकर्‍यांनी वनशेती करावे असे सांगितले. निवृत्त जलसंधारण अधिकारी सत्तारखान जमलखान यांनी मराठवाड्यामध्ये बरही जातीच्या खजूर लागवड व त्याला पोषक वातावरण असून खजूर लावगडीपासून तिसर्‍या वर्षापासून उत्पादनास सुरूवात होते. त्यामध्ये दहा वर्षापर्यंत अंतरपिके सुद्धा घेता येतात. एकरी पाच ते सात लक्ष रूपये पर्यंत उत्पादक शेतकरी घेवू शकते त्यामुळे बरही खजूर लागवड करावी असे श्री.खान यांनी सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी भराडखेडा येथील भाऊसाहेब घुगे यांच्या नाथ कृषी फॉर्म वरील कोकन बहाडोळी जांभुळ, इस्त्रायल व जर्मन तंत्रज्ञानाने लागवड केलेले केशर आंबा, ब्राझील जैन सुर द्वारे लागवड केलेले मोसंबी बाग, बरही खजूर, सुमन अ‍ॅग्रो सीडला ची मालामाल तुर व मुग प्लॉट, अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या केशर आंबा प्लॉट व नाथकृषी रोपवाटीकेचे शिवार फेरीद्वारे तंज्ञांनी व शेतकर्‍यांनी पहाणी केली. बारगाजे कृषी फार्म व न्याहरी व शिवार फेरीद्वारे मिस्त्र फळबाग, कपासी, सोयाबीनची पहाणी केली. मुरलीधर मुळक व भगवान बारगाजे यांच्या मोसंबी बागेची पाहणी केली. कृष्णा शिंदे यांच्या लखनऊ पेरू बागेची पहाणी केली. रमेश दहाडे यांच्या मोसंबी बागेची पहाणी करून बागेवर झालेल्या किडीमुळे किटक शास्त्रज्ञानीं उपाययोजना सुचविल्या. बाबुराव दराडे यांच्या सिताफळ, मोसंबी, केशर अंबा, बागेची पाहणी करून पावसाळ्यामध्ये बागेमध्ये घ्यावयाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. बाळाजी शिंदे यांच्या शेडनेट शेतमधील शिममला मिरची व कारले प्लॉटची पाहणी केली. लक्ष्मण सवडे व भगवान बनकर यांची गट शेती संघाचा अहवाल सादर केला. यावेळी परिसरातील प्रगतशिल आर्दा शेतकर्‍यांच्या सत्कारही करण्यात आला.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब घुगे, अनुशेष फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रामदास बारगाजे, भगवान बनकर, लक्ष्मण सवडे, कैलास पालवे आदिनी विशेष परिश्रम घेतले. सरपंच भगवान बारगाजे, उपसरपंच प्रकाश शिंदे, रामेश्वर दराडे, नारायण घुगे, गंगाधर दराडे, भानुदास बारगाजे, प्रल्हाद दराडे, बाबासाहेब दराडे, रमेश दराडे, बाबुराव दराडे, रायसिंग सुंदर्डे, पुनमसिंग राजपूत, गणेश सांगळे, भगवान कदम, कृष्णा दराडे, रामदास घुगे, अर्जुन तुपे, कृष्णा शिंदे, मुरलीधर मुळक, बाळु मुळक, प्रल्हाद बारगाजे, सुखदेव जावळे, बाबासाहेब राऊत, आन्ना दराडे, ब्रम्हा दराडे, योगेश बारगाजे, दिनेश बारगाजे, संदिर दराडे, बाळु दराडे, समाधान दराडे, रूस्तुम मुळक, भानुदास डिघे, बाबासाहेब दराडे, किशोर मरकड, गोंविदराव पंडीत, डॉ.कोरडे, राधाकिसन मदतन, बद्री खुरमुटे यांच्यासह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!