मनसे जिल्हाध्यक्ष यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून केली पूरग्रस्तांना मदत
म न से जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी केला पूरग्रस्तांसाठी निधी राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त…!
बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
बदनापूर ता.(07)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी ता.06 शुक्रवार रोजी पुणे येथे मराठवाडा जिल्हा अध्यक्ष बैठक दरम्यान पूरग्रस्तांना मदत सोरूपात मनसे शाखा जालना जिल्हाच्या वतीने राज साहेब ठाकरे यांच्याकडे निधी सुपूर्त केला..
शुक्रवार रोजी पुणे येथे मनसेची मराठवाडा जिल्हाध्यक्षांची बैठक मनसे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी आयोजित केली होती त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुका मनसे शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेतून निधी न जमा करता मनसे शाखा सदस्याकडून आपसात पूरग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी संकलन केला व तो आज या बैठकीत सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे,शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे,मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोकजी तावरे,
जालना जिल्हाध्यक्ष गजानन गिते,जालना तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे,उपतालुका अध्यक्ष श्रीकांत राठोड यांची उपस्थिती होती..