जाफराबाद तालुका

शिक्षक अढावे व देठे यांच्या सेवापुर्तीचा ग्रामस्थांनी केला गौरव

सुनील जोशी/ जाफराबाद

images (60)
images (60)

येथील जेबीके विद्यालयातील शिक्षक शेषराव अढावे व तपोवन गोंधन शाळेचे मुख्याध्यापक दगडुबा देठे हे दोघे नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीमुळे त्यांचे जन्मगाव जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथे दोघांचा गुरुवारी ग्रामस्थ व केंद्रातील शिक्षकांतर्फे सपत्निक सेवापुर्ती गौरव सम्मान करण्यात आला. 

  यावेळी डावरगावदेवी चे सरपंच अनिल नवले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय नवले, शिक्षणविस्तार अधिकारी राम खराडे, माजी उपसरपंच विष्णू नवले, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव अवकाळे, सखाराम नवले, आर.डी.लहाने, शंकरराव देशमुख, नायबराव अढावे, पी.आर.अढावे, समाधान फलके, दामोधर फलके, परसराम चौधरी, शिवाजी फलके आदिंसह दोहोंच्या परिवारजणांंची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी टेंभुर्णी केंद्रातील शिक्षक व डावरगाव देवी येथील ग्रामस्थांतर्फे दोघा सेवानिवृत्त शिक्षकांना कपडे व भेटवस्तू देवून सपत्नीक गौरविण्यात आले. प्रमाणिकपणे सेवा केली तर त्याची दखल समाज घेत असतो. यासाठी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने सदोदित कार्यरत रहावे असा भावोद्गार दोघां सत्कारमुर्तींनी काढले. यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून दोघा सत्कार मुर्तींच्या कार्याचा गौरव केला.   

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश उगलमुगले यांनी केले. प्रास्ताविक आदर्श शिक्षक शेख जमीर यांनी केले. तर पंजाब दांदडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डावरगाव देवी शाळेचे मुख्याध्यापक महेश आहेर, शिक्षक शेख जमीर, गोविंद जाधव, तुळसीदास जाधव, रत्ना देशमुख, पुष्पा साखरे आदिंसह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!