कुंभार पिंपळगावात अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विठ्ठल मंदिरात दि.9 आगस्ट ते दि.16 आगस्ट दरम्यान अंखड हरिनाम मधुकरी सप्ताहाचे आयोजन करण्यात आला आहे.या अखंड हरिनाम मधुकरी सप्ताहात दररोज पहाटे चार ते सहा काकडा आरती,सकाळी सात ते दहा दिंडी प्रदक्षिणा,सकाळी अकरा ते एक गाथा भजन,सायंकाळी सहा ते सात हरिपाठ,व रोज रात्री नऊ ते अकरा हरीकिर्तन तद्नंतर हरीजागर आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहातील किर्तन याप्रमाणे-
दि.9 आगस्ट रोजी ह.भ.प. अनिरुद्ध महाराज आधुडे,दि.10 रोजी ह.भ.प. भागवत महाराज दोबोले,दि.11 रोजी ह.भ.प. पांडूरंग महाराज आनंदे,दि.12 रोजी ह.भ.प. विष्णू महाराज आनंदे,दि.13 रोजी ह.भ.प. नंदू महाराज जाधव,दि.14 रोजी ह.भ.प.गितांजली ताई गाडेकर,दि.15 रोजी ह.भ.प. विजय महाराज आर्दड,यांचे हरिकिर्तन होईल. तर दि.16 सोमवार रोजी ह.भ.प.सिताराम महाराज रोडगे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.