दिवाळी अंक २०२१परतूर तालुका

खरीप हंगाम संपत आला तरी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही, जलद गतीने वाटप करा – शिवसेनेची मागणी


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, हे शेतकऱ्यांना अत्यंत संथगतीने पीक कर्ज वाटप करीत असून यात अनियमितता दिसून येत असल्याचे परतुर शहर शिवसेना प्रमुख दत्ता सुरुंग यांनी विभागीय बँक व्यवस्थापक औरंगाबाद यांना तक्रार केली आहे.

images (60)
images (60)

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चालू असून पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज असताना परतूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज देत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परतूर शाखेमध्ये शेतकरी दोन महिन्यापासून चकरा मारत आहेत त्यांना पीककर्ज मिळत नाही व काही दलाल बँक कर्मचाऱ्यांची हात मिळवणी करून अर्थपूर्ण व्यवहार करून आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांचे पीक कर्जाची कामे करून घेत आहेत.आणि सर्वसाधारण शेतकरी बँकेत चकरा मारून मारून हैराण होत आहेत. यांच्यासोबत कर्मचारीही व्यवस्थित बोलत नाहीत, अरेरावीची भाषा करतात. बँकेतील सुरक्षा रक्षक हे शेतकऱ्यांसोबत अपमानजनक वार्तालाप करीत असून त्यांना दमदाटी करतात असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे. पुढे असे आहे की, शासनाचे आदेश असताना सुद्धा बँक व्यवस्थापक सर्व साधारण शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे कामे जाणून बुजून करत नाहीत तसेच दलालामार्फत आलेली कामे अर्थपूर्ण व्यवहार करून कामे केली जात आहेत असा आरोपही या निवेदनात केलेला आहे. दलालाशी हात मिळवून पिक कर्ज करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करावी व बँक व्यवस्थापकांनी तात्काळ शेतकऱ्यासाठी पीक कर्ज मंजूर करुन जलद गतीने वाटप करावे. नसता आपल्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता सुरुंग यांनी विभागीय बँक व्यवस्थापक औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!