भोकरदन तालुका

बुथ प्रमुख सदस्यांनी व पंन्ना प्रमुखांनी केंदाच्या विविध प्रकारच्या योजना सर्व सामान्य पर्यंत पोचविण्यासाठी तळमळीने काम करावे : राजकुमार राजपुत

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)


भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हाना येथे दिनांक १२सप्टेंबर रोज गुरुवारी सकाळी ९:१५ वाजता श्रीकृष्ण मंदिर परिसरातील वाचनालयाच्या परीसरात नुकताच
भारतीय जनता पार्टी भोकरदन यांच्या वतीने समर्थ बुथ अभियानांतर्गत व
डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ६ जुलै ते १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत समर्थ बुथ अभियान या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सर्कल निहाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन तालुक्यातील प्रत्येक गावोगावी व खेडोपाडी वाड्या वस्त्यावर सदरील कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


यात सशक्त बुथ, सशक्त भाजप, सशक्त महाराष्ट्र, सशक्त भारत, विषयाला अनुसरून अभियान राबविण्यात येत आहे.
यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार, आणि केंद्रातील मोदी सरकारने केलेली जनहिताची कामे व समाजपयोगी,व विविध विकासात्मक कामे गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय याबाबत सविस्तर माहिती व चर्चा व हितगुज, व गाव भेट कार्यकर्त्यांनशी संवाद साधण्यासाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ६ जुलै ते १७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत समर्थ बुथ अभियान कार्यक्रम राबविण्यात येत यात दिन दलीत गोरगरीब जनतेला विविध योजनांची माहिती बुथ प्रमुख,बुथ सदस्य,व पन्ना प्रमुखांनी द्यावी व येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष संघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न गावपातळीवर कार्यकर्त्यांनी व जबाबदार पदाधिकारी यानी करावे असे आवाहनही भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा सांस्कृतिक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजकुमार राजपुत यांनी बोलताना सांगितले.


यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणेश पाटील ठाले, सभापती विनोद गावंडे,माजी सभापती भानुदास सरोदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुनिल सरोदे, सरपंच रामभाऊ दुधे, सिद्धेश्वरचे संचालक कैलास गावंडे, राजकुमार राजपुत,काकाजी गावंडे,भाजपा कामगार आघाडीचे तालुका सदस्य, सदाशिव सोनवणे,ग्रा.स.योगेश गावंडे, शंकर कायटे, प्रभाकर सरोदे,शेख कलीमभाई, देविदास पांढरे, दगडु गावंडे, जेष्ठ नागरिक डोगरसिंग शेवगन, साहेबराव गावंडे, विठ्ठल गावंडे, कौतीकराव ठाले,लक्ष्मन दुधे, चैनसिंग कायटे, गजानन सरोदे, सुधाकर साळवे,ज्ञानेश्वर गावंडे, समाधान सोनवणे, शंकर गुंजाळ, गंगाधर पांढरे,संपत पांढरे, कचरु साळवे, गेदीलाल कायटे, संजय गावंडे, उत्तम ठाले, गणेश सोनवणे, भाऊसाहेब पांढरे, समाधान दुधे,प्रकाश राठोड, गजानन दुधे, सुरेश दुधे,मनोज गुंजाळ, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते, बुथ प्रमुख, बुथ
सदस्य,पन्ना प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी, गावकरी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संदीप गावडे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!