भोकरदन तालुका

विष पिऊन तरुण शेतकर्याची आत्महात्या,भोकरदन तालुक्यातील घटना

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील टाकळी भोकरदन येथील एका तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि.१४ आॅजस्ट शनिवार रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे . आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ज्ञानेश्वर शेषराव कड वय (२२) आहे.

तालुक्यातील टाकळी भोकरदन येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर कड हा मागील काही दिवसांपासून वडिलांवर असलेल्या कर्जामुळे अस्वस्थ दिसून येत होता . त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात लावलेला पिकाचा खर्च देखील निघणे मुश्कील झाले होते . आधीच सततच्या नापिकीने त्रस्त झालेले असताना त्यात कोरोनामुळे अडचणीत आणखी वाढ झाली . त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्याने शनिवारी सकाळी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले . यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले . येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असतांना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली . या प्रकरणी भोकरदन पोलीसांनी पंचनामा केला असून , आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे .

ज्ञानेश्वरच्या अचानक जाण्याने कड परिवार दु:खाचा डोंगर
ज्ञानेश्वरचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता . होतकरू असलेल्या ज्ञानेश्वरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . त्याचा पश्चात पत्नी , आई , वडील , लहान भाऊ असा परिवार आहे . शनिवारी दुपारी तीन वाजता त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!