संपादकीय

इन्कमटॅक्स ची बेकायदेशीर धाड सुद्धा बंधनकारक आहे का ?

सोप्या भाषेत शिका इन्कमटॅक्स-सीए.गोविंदप्रसाद एस.मुंदडा

सीए.गोविंदप्रसाद एस. मुंदडा सीए.आकाश जी. मुंदडा जालना

sms 010921
atul jiwalers1508

अनेक आठवड्यापासून आपण सध्या सर्व्हे बद्दल चर्चा करित आहोत. आपणास विसर पडू नए म्हणून आपण काय काय आतापर्यंत बघितले याची संक्षिप्त पुनरावृत्ती करणार आहोत. आपण सर्व्हे म्हणजे काय ? सर्व्हे आणि सर्च मधील फरक बघीतले. आपण कलम 133 ए आणि 133 बी खालील दोन प्रकारचे सर्व्हे असतात व त्या मधले फरक बघीतले : बोली भाषेतील सर्व्हे आणि धाड या मधील फरक बघीतले. मोठे भव्य लग्न किंवा वास्तुशांती झाल्यास इन्कमटॅक्स वाले काय करू शकतात हे ही बघीतले. तुमच्या घरी इन्कमटॅक्स अधिकारी कधी येऊ शकतात ? संबंधित सी.ए च्या कार्यालयात सर्व्हे कधी करता येतो ? इन्कमटॅक्स अधिकाऱ्यावर कधी कार्यवाही होऊ शकते ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बघीतली, जी व्यवहारात उपयोगी ठरावी .

प्रश्न – अवैधानिक सर्व्हे करदात्यावर करण्यात आले व काही माहिती त्यांना मिळाली तर त्याचा उपयोग करदात्याविरोधात करण्यात येऊ शकतो का ? या बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतात ?
उत्तर- या बाबत सुप्रीम कोर्टा चे दोन निर्णय आहेत. असाच पहिला प्रसंग सुप्रीम कोर्टा समोर पुरनमल विरुद्ध डायरेक्टर ऑफ इन्स्पेक्शन (इन्वेस्टीगेशन) 93 ITR 505 या केस मध्ये आला. या प्रसंगी इन्कमटॅक्स च्या डायरेक्टर ऑफ इन्वेस्टीगेशन यांनी पुरनमल यांच्या वर बेकायदेशीर सर्च केला. म्हणजे सोप्या भाषेत असे म्हणता येईल की बेकायदेशीर धाड टाकली आणि या धाडी मध्ये पूरनमल च्या विरोधात जे काही चुकीचे कागदपत्रे सापडलीत ती वापरली. पुरनमल यांनी कोर्टाला सांगीतले की हि धाड बेकायदेशीर होती म्हणून माझ्या विरोधात कुठली ही सापडलेली, कागदपत्रे यांचा वापर इन्कमटॅक्स वाल्यांना करता येऊ नये म्हणुन बंदी घालावी. परन्तु सुप्रीम कोर्टाने धाड बेकायदेशीर होती हे मान्य केले परन्तु इन्कमटॅक्स विभागाला सापडलेली कागदपत्रे पुरनमलच्या विरोधात वापरता येतील असाच निर्णय दिला. असाच निर्णय सुप्रीम कोर्टाने डॉ. प्रतापसिंग विरुद्ध डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेन्ट 155 ITR 166 या केस मध्ये ही दिला. सारांश मध्ये सोप्या भाषेत असे म्हणता येईल की करदात्यांनी दोन नंबर चे व्यवहार टाळावे अन्यथा कायदेशीर धाडीमध्येच काय तर बेकायदेशीर धाडीमध्ये सुद्धा करदात्यावर कार्यवाही होऊ शकते.

पुढील भाग रविवार-
पुढील रविवारी आपण बघणार आहोत की भव्यलग्न किंवा काही मोठे कार्यक्रम झाल्यास इन्कमटॅक्स चे अधिकारी नेमके काय काय प्रश्न विचारू शकतात जे व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!