बदनापूर तालुका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेत पास झाल्याने माझे केंद्रातील राज्यमंत्रीपद कायम:दानवे


बदनापूर, ता. 20 (प्रतिनिधी ; किशोर सिरसाट ) : जनतेच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेत पास झाल्याने माझे केंद्रातील राज्यमंत्रीपद कायम आहे. केंद्रातील 12 मंत्र्यांना काढण्यात आले, अशा भूकंपात देखील आपली विट हलली नाही तर लोकांच्या जिव्हाळ्याचे रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने आपल्या भिंतीला आणखी मजबूत प्लास्टर झाले आहे, अशा आपल्या खास शैलीत केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म मंत्री रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथे शुक्रवारी (ता. 20) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात उपस्थित जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नवीन जबाबदारी देखील आपण समर्थपणे पार पाडत त्याचा उपयोग मराठवाड्याच्या विकासासाठी करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

images (60)
images (60)

तर गोपीनाथ गडावरून काढण्यात आलेल्या जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या केंद्राच्या योजनांविषयी असलेल्या भावना जाणून घेत आहे. केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला. बदनापूर तालुक्यात जन आशिर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. ही यात्रा बदनापूर शहरात पोचल्यावर जाहीर कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे व श्री. डॉ. कराड यांचा नागरी सत्कारही करण्यात आला.


या कार्यक्रमास आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री भाऊराव देशमुख,  भास्करराव दानवे, मनोज पांगारकर, प्रवीण घुगे, दीपक ठाकूर, रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुळे, कपिल दहेकर, सुहास सिरसाठ, अवधूत खडके, जितेंद्र पालकर, बद्रीनाथ पठाडे, हरिश्चंद्र शिंदे, बबन सिरसाठ, अनिलराव कोलते, वसंतराव जगताप, पद्माकर जऱ्हाड, भीमराव भुजंग, सत्यनारायण  गेलडा, गणेश कोल्हे, भगवान मात्रे, सुप्पडसिंग जगरवाल, बाळासाहेब तायडे, मनोज तोडावत, संतोष पवार, विलास जऱ्हाड, जगन बारगजे, प्रदीप साबळे, भगवान भोजणे, देविदास कुचे, रावसाहेब भवर, कल्याण काळे, बाळू काळे, गोरखनाथ खैरे, बाबासाहेब कऱ्हाळे, शंकर धुमाळ, सुभाष डीघे, सुभाष बोडखे, भगवान गाढे, मुकुंद जैवाळ, केदार टेकाळे, विलास जऱ्हाड, राम पाटील खरात, विष्णू कोल्हे, नामदेव तिडके, भगवान बारगजे, उद्घव जायभाये, संजय जगदाळे, राहुल खरात, भगवान गीते, नंदू शेवाळे, संजय घुगे, दगडू बोंडारे, अनंत हुसे, सुधीर पवार, तोताराम बहुरे, दत्तू पाटील लहाने, रामसिंग गुसिंगे, भगवान कदम, योगेश कान्हेरे, गजानन काटकर, नसीर बागवान, एकनाथ मोरे, गणेश बावणे, बाबुराव खरात, सुरेश लहाने, धोंडू ढाकणे, सुभाष राठोड, हरिभाऊ सुकासे, सत्तार पटेल, परमेश्वर लेंभे, सदाशिव घुगे, डॉ. गंगाधर पांढरे, डॉ. नंदकिशोर पिंगळे, कल्याण पवार, प्रदीप पवार, युसुफ मणियार, साईनाथ उकर्डे, अंकुश राठोड, दत्ता नागवे, भाऊसाहेब मगरे, परमेश्वर मदन, माधव ढाकणे, भगवान दसपुते, शेख समीर, भीमराव पवार, अंकुश अडसूळ, गणेश शिंगाडे, उमाजी चव्हाण, बालाजी वीर, नामदेव गीते, भगवान घाडगे, संतोष सिरसाठ, नंदू धोत्रे, संजय वाघमारे, कैलास राठोड, शरद अवघड, सुदाम बोचरे, श्रीराम गाडेकर, सुरेश तोडावत, दीपक मुंडलिक, संदीप पवार, कृष्णा सिरसाठ, बद्री गवारे, मुदसिर काजी, भगवान घनघाव, डॉ. घुनावत, निवृत्ती शेवाळे, समाधान मुंढे, विनोद मगरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, आपल्या आशिर्वादाने मागील 35 वर्षांपासून मी आमदार – खासदार आहे. यात सर्वाधिक प्रेम बदनापूर मतदार संघातील जनतेने दिले आहे. आपण मला जनतेच्या परीक्षेत पास करता मात्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेतही यशस्वी झाल्याने मला लोकांच्या जिव्हाळ्याचे खाते मिळाले आहे. अर्थात विरोधक माझे मंत्रिपद जाण्याची वाट पाहत होते. मात्र मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांना अर्धचंद्र मिळूनही आपल्या भिंतीची वीट हलली नाही. उलट मजबूत प्लास्टर झाले. जनता हीच माझे हिरा – पन्ना असल्याने मला कुठलीच अंगठी घालण्याची वेळ आली नाही. राज्यात युतीचे सरकार असताना विकासाची प्रक्रिया गतीने होत होती. मात्र शिवसेनेने धोका देऊन नवीन घरोबा केला मात्र अमर, अकबर, एन्थोनीचे सरकार गोंधळात आहे. केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य जनता आणि सर्वसमावेशक विकासाचे काम करीत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारत देशात केवळ केंद्राच्या नियोजनामुळे आपण दुसरी लाट प्रभावीपणे थोपवू शकलो. यात लॉकडाऊनच्या काळात देशातील 80 कोटी कुटुंबांना मोफत अन्न – धान्य केंद्र सरकारने पुरवले. केंद्र सरकारने नुकसान सहन करून लोकांना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले. शिवाय सर्वाधिक मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणही देशात झाले. आपल्याला मिळालेल्या राज्यमंत्रपदाचा उपयोग मराठवाड्याच्या विकासासाठी करणार असल्याची ग्वाही शेवटी दानवे यांनी दिली.
यावेळी भागवत कराड यांनी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवत असून त्यांच्या योजनांबाबत असलेल्या भावनाही जाणून घेत आहे. असे मत व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!