ओबीसी समाजातील युवकांनी व्यवसाय करणे काळाची गरज-अशोक लांडे
अनिल भालेकर/अंबड
तालुक्यातील लोणार भायगाव येथिल जांबुवंत दूध डेअरीचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा नगरसेवक अशोक लांडे यांच्या हस्ते संपन्न आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोजने, युवक जिल्हाध्यक्ष गोविंद जाधव, शहराध्यक्ष सचिन खरात, सरपंच रामप्रसाद दसपुते,उपसरपंच जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अशोक लांडे असे म्हणाले की, ग्रामीण भागातील ओबीसी तरुणांनी शेतीला जोड धंदा म्हणून छोटे-मोठे लघुउद्योग करण्याची गरज आहे. ओबीसी समाजातील तरुण युवकांनी बाजारपेठेत आवश्यक असनाऱ्या नवनवीन उद्योग क्षेत्रात उडी घेणे ही आज काळाची गरज बनली आहे.
नौकरी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्व ओबीसी तरुणांना उद्योग व्यवसायासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तालुकास्तरावर करण्यात येऊन शिबिराचे आयोजन देखिल करण्यात येणार असल्याचे मत लांडे यांनी व्यक्त केले. यावेळी बद्रीनाथ वैद्य, श्याम जाधव, परमेश्वर कुंडकर, तुळशीराम रोटे, संभाजी रघुनाथ बोंबले, कुंडलिक बोंबले, संभाजी बोंबले यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.