परतूर तालुका

नारायण राणे विरोधात गुन्हा दाखल करा – परतुरात शिवसेनेची मागणी

images (60)
images (60)

दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या मुळे उच्च संविधानिक पदाचा आशा अर्वाच्च भाषेत खालच्या स्तरात बोलून पदाचा अवमान केल्याप्रकरणी परतूर येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात तिव्र शब्दात निषेध व्यक्त करून परतुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग, शिवसेना शहर प्रमुख विदूर जईद, युवासेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे, शिवसेना दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव, युवा सेना शहर प्रमुख राहुल कदम, शिवसेना उपशहरप्रमुख बापू घटमाळ शिवसेना उपशहरप्रमुख राजेश भोसले, भैय्या कवडी, तुळशीराम निकाळजे, आबासाहेब कदम, अजय देसाई, राजेश भारूका, तुकाराम बोरकर ,शुभम दिंडे ,दिलीप निकम यांच्यासह तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!