परतूर तालुका
रोहीणा येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाची प्रभात फेरी काढून झाली सांगता
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
श्रावण पौर्णिमा निमित्त रोहिना बू. येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हे लोकांना समजावून सांगण्यात आला . बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची गावात प्रभात फेरी काढून लोकांमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म याची जनजागृती करण्यात आली . बुद्ध आणि त्यांचा धम्म या कार्यक्रमांमध्ये युवा वर्ग महिला पुरुषांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रामचंद्र पानवाले , अंकुशराव लांडगे , हेमंत पहाडे ,अशोक खरात, सुदाम मस्के, सुभाष ठोके, अर्जुन शेजुळ ,बनकर ,व भालेरावसह सर्व गावातील बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.