भोकरदन येथे ग्रामसेवकांची राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
मधुकर सहाने : भोकरदन
राहत्या घरात गळफास घेऊन ग्रामसेवकाने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे सदरील घटना शहरातील नवीन भोकरदन परीसरातील पुखराज नगर शिक्षक काॅलनी येथे सोमवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली संतोष भिमराव पाटील वय 31.वर्ष हल्ली मुकाम जोमाळा,असे आत्महत्या करणारे ग्रामसेवकाचे नाव आहे .
संतोष पाटील हे कोदोली येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते केदारखेडा येथेही त्यांना जोडण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले दि.२४ रोजी राञी ८ वाजेच्या दरम्यान पत्नीने आरडाओरड केला हे ऐकून शेजारी पाजारी लोकांनी धाव घेत घरचा दरवाजा तोडून संतोष याला खाली काढून उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहीती भोकरदन पोलिसांना देण्यात आली असुन पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
संतोष भिमराव पाटील हे एक मन मिळाऊ स्वभावाचे होते शिक्षक काॅलोणीत त्यांनी नवीन घरही बांधले आहे मित्र मंडळींत संपर्कही दांडगा होता मित्र मंडळींना घटनेची माहीती मिळताच ग्रामिण रूग्णालय परीसरात मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती त्यांच्यावर बुधवारी ग्रामिण रूग्णालयात शैवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आणि सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळ गावी जोमाळा येथे अंतिमसंकार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पत्नी,एक चार वर्षीय मुलगी आई वडील एक भाऊ असा परीवार आहे.