घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची सदिच्छा भेट
कुंभार पिंपळगाव येथे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे आले असता कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज दि.26 गुरूवार रोजी सदिच्छा भेट दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक लालासाहेब शिंदे. केंद्रप्रमुख. एस. एस. गुजर,तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, राजाभाऊ शिंदे,भाऊराव काळे, दत्ता बिलोरे,परमेश्वर जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले शेतकरी श्री दिगंबर आधुदे. दत्तात्रय शिंदे. गजानन आधुडे,उद्धव राठोड,उपस्थित होते.