शुभंकरोती फाउंडेशन नांदेडच्या वतीने गरजूना मोफतअन्नधान्य वाटप
दिपक हिवाळे /परतुर न्युज नेटवर्क
कोरोनाची दुसरी लाट देशात संपुष्टात येत असताना तज्ञांनी व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून काही संस्था मदत कार्य करण्यास सरसावल्या असून त्यापैकीच एक शुभंकरोती फाउंडेशन नांदेड च्या वतीने मौजे सिरसगाव ता.परतूर जि.जालना येथील ग्रामीण भागात जाऊन शुभंकरोति संस्थेने संपूर्ण गावात फिरून आरोग्य विषयक जनजागृती करून येथील जनतेला कोरोना पासून बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन केले व गरजूंना मोफत अंन्नधान्य वाटप करून कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मोफत मास्क वाटप केले त्याचबरोबर तापमापक यंत्राद्वारे तापमान तपासणी व ऑक्सिमीटर ने ऑक्सिजन लेवल सुद्धा मोफत तपासण्यात आले या वेळी कोरोना नियमाचे पालन करून गावातील अनेक महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत गरजूना मदत करण्यात आली.
संस्थ्येच्या सीएफ सौ.छाया घोरबांड म्हनाल्या की हि संस्था गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करत असून महिला व मुलीसाठी खूप उपयुक्त असे मार्गदर्शन व गरजेच्या साहित्याची पुरवण अगदी मोफत करते.यावेळी सरपंच गोदावरी कंकाळ, उपसरपंच प्रभाकर जाधव,विकासराव खरात,स्वप्निल रोडगे,पोलीस पाटिल शेषेराव सोळंके, आसाराम कंकाळ, मदन बापू खरात, राजू वाहुळे, मंदाकिनी खरात, सामाजिक कार्यकर्ते दीपक कुळकर्णी व गरजवंत उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती घोरबांड व आदीनी परिश्रम घेतले.