आष्टी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत महिलांनी विचारला असुविधाबाबत जांब
आष्टी/राजेश्वर नायक
आष्टी येथील गढी मोहल्ला भागात नागरी सुविधांचा अभाव आसल्याने या भागातील महिलानी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत शिरकाव करून गोंधळ घातल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती आशी की दि.३० सोमवार रोजी आष्टी ता.(परतूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते, सभा सुरु असतानाच येथील गढी मोहल्ला भागातील २०ते २५ महिलांनी चालू असलेल्या मासिक सभेत अचानक पणे शिरकाव करत ग्रामविकास अधिकारी यांना नागरी सुविधांच्या बाबतीत विचारणा केली,याभागात सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने वाद निर्माण होत आहेत यासाठी उपाययोजना करण्यात यावी आशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. रुरबन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या भूमिगत गटार व सिमेंट रस्ते कामाबाबत जाब विचारला यामुळे काहीं काळ तणाव निर्माण झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शी कडून सांगण्यात आले आहे,नाली बांधकाम करून देण्यात यावे आशी मागणी सदरील महिलांनी केली असून याविषयीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
आष्टी ग्रामपंचायत साठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असताना विकासकामातून काही भाग वगळले जात असल्याचे लक्षात आले असल्याने सदरील प्रकार घडला असल्याचे बोलल्या जाते,याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता बाबुराव मस्के यांच्याशी संपर्क साधला असता गढी मोहल्ला भाग अंदाजपत्रकात येत नाही असे सांगून खात्रीपूर्वक माहिती अंदाजपत्रक बघून सांगतो असे सांगत निधी अभावी गावातील प्रमुख रस्ते विकास करण्यात येत आहेत, यातून निधी शिल्लक राहिला तर बाकी कामे करण्यात येतील असेही मस्के यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास अधिकारी एन बी काळे यांना विचारले असता याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक विभाग देऊ शकतो असे सूतोवाच काळे यांनी केले.
कोरम पूर्ण नसल्याने सदरील मासिक सभा तहकूब करण्यात आली असल्याची माहिती देखील काळे यांनी दिली, विशेष म्हणजे आष्टी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन आज दि ३१ रोजी करण्यात आले असून या ग्रामसभेत काय गोंधळ उडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.