अखिल भारतीय जमियत उल ॲक्शन कमिटीच्या परतूर तालुका अध्यक्षपदी रज्जाक कुरेशी यांची निवड
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
येथील कुरेशी समाजाच्या हिताच्या लढ्यासाठी सदैव तत्पर असलेली संघटना कुरेशी अक्शन कमिटी काम करीत आहे. कमिटीचे कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोहण्याच्या उद्देशाने परतुर येथील रज्जाक कुरेशी यांची परतूर तालुकाअध्यक्ष पदी नियुक्ती शहानवाज कुरेशी, मराठवाडा अध्यक्ष समीर कुरेशी यांनी केली आहे.
रज्जाक कुरेशी हे गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या सामाजिक कार्यासाठी सदैव आग्रही असतात. समाजाच्या कार्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असल्याने त्यांच्या कार्याची दाखल घेत. ॲक्शन कमिटीनी परतूर तालुका अध्यक्षपदी निवड केली. या निवडीबद्दल कमिटीचे वर्किंग सदस्य शहानवाज कुरेशी, मराठवाडा अध्यक्ष समीर कुरेशी, जिल्हाध्यक्ष मुजम्मिल कुरेशी, तारेख सिद्दीकी, आसिफ कुरेशी, अजय देसाई,नईम कुरेशी, जुल्फिकार कुरेशी, मतीन कुरेशी, हाजी कुरेशी यांनी नियुक्ती बद्दल रज्जाक कुरेशी यांचा सत्कार करून शुभेछा दिल्या.