भोकरदन तालुका
मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी ६९ रुग्ण औरंगाबादला रवाना
मधुकर सहाने : भोकरदन
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्रतपासणी शिबिरात मोतीबिंदू असणारे ६९ रूग्ण आढळून आले होते त्यांची मोफत शस्त्रक्रिया लायसन्स क्लब औरंगाबाद येथे दि १ व२ सप्टेंबर २१रोजी होणार असून आज स्कूल बसने सर्व रूग्णांना मोफत रवाना करण्यात आले.
यावेळी भोकरदन लायसन्स क्लबचे अध्यक्ष अमृतभाऊ देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते, नगरसेवक रिझवान शेख,रमेश जाधव, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सोपान सपकाळ,साळुबा लोखंडे, रोषण देशमुख, ज्ञानेश्वर तोटे, प्रकाश मनेलीकर पंजाबराव देशमुख, दिलीप शेळके यांच्यासह राजाभाऊ देशमुख मित्र मंडळ व श्री गणपती परिवाराच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.