देश सेवा करून मायदेशी परतलेल्या सय्यद यासीन सैनिकाचा भोकरदन येथे भव्य सत्कार

मधुकर सहाने : भोकरदन
जालना जिल्ह्यातील जाफराबाद मधील माहोरा येथील भूमीपुत्र सय्यद यासीन हे गेल्या 24 वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते.देश सेवा करून मायदेशी परत येत असताना भोकरदन तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ तसेच सामाजिक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले होते.फटाक्यांची आतिषबाजी करून सैनिक सय्यद यासीन यांच्या स्वागत केलं.
यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाचे काशीनाथ पंडित, बबनराव शिंदे,रामचंद्र गायके, पंजाबराव पवार,दिनकर थोटे,रवींद्र दांडगे,विष्णु लोखंडे,अंकुश वराडे,नाथा मव्हरे,कृष्णा ईगळे,रमेश पवार,प्रशांत भालेराव,वामन जंजाळ,सामाजिक कार्यकर्ते,महेश पुरोहित,सुरेश तळेकर,आप्पासाहेब जाधव,सुनिल पिसे,इंद्रजित देशमुख, गजानन गावडे,रवी वाघ,महेश ओठी, विनोद मिरकड,रमेश जाधव,अगत सहाणे,महेश औटी यांच्या अन्य नागरिक उपस्थित होते.
