भोकरदन तालुका

जुई धरणात दोन दिवसात 10 फूट पाणी साठा, 40% जलसाठा उपलब्ध 

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील दानापुर येथील जुई मध्यम प्रकल्प आजरोजी शेवटचा श्वाश घेत होता. परंतु दी.३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बहुतांश भागात मद्यम ते मूसळधार पाऊस पडला त्यामुळे आनवा,गोलेगाव,वाकळी,सारोळा,पाळा, उंडन गांव,सुरंगळी,मूर्तड या आदी भागात मोठा पाऊस झाल्यामुळे जुइधरण मधे 40% पर्यंत जलसाठ्यात वाढ झाली आहे म्हणजेच 10 फूट पर्यंत पाणी साठा झाले आहे त्यामुळे यांदा ही २५ गवांचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला .

मागील दोन वर्षा पासून सलग दोन वर्ष जून च्या शेवटच्या आठोड्या हा प्रकल्प भरलेला होता परंतु यंदा जून,जुलै, ऑगस्ट पर्यंत केवळ २%जलसाठा उपलब्ध होता व महिन्या भरात हा धरण १००% कोरडेठाक होण्याच्या मर्गवार अवलंबून होता.परिसरातील भोकरदनशहर सहित २५ गवांची चिंता वाढलेला होती यंदा पिण्याच्या पान्याचा प्रश्न मार्गी लागनार कि नाहि. हा प्रश्ना जनते समोर पडला होता परंतू ३१ ऑगस्ट रोजी सकाळी व संध्याकाळी पडलेल्या पावसाने मात्र धरणाच्या जलसाठयात वाढ झालेली आहे व परिसरतील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे आणि खरीप पिकांचेही जीव आता १००% वाचले आहे. पोळा सनही  शेतकरी राजा आता आनंदात साजरा करणार आहे

दिनांक :- 02/09/2021

पाणीपातळी :-  582.10

एकुण साठा   :- 2.471 दलघमी 

उपयुक्त साठा  :-2.471 दलघमी

टक्केवारी   :-  40.94 %

आजचे पर्जन्यमान:- 18.00 मीमी 

एकुण पर्जन्यमान :- 377.00 मीमी

आजचा येवा:-  0.00 दलघमी .

1जुन पासुन एकुण येवा :-  दलघमी

बाष्पीभवन : 0.0

सिंचन पाणी वापर: 00 दलघमी

बिगर सिंचन पाणी वापर: 0.0072 दलघमी

आजचा सांडवा विसर्ग:  0.00 दलघमी

(0.00cusec)

RBC -0.00 cusec

LBC -0.00 cusec

मागील वर्षाचा उपयुक्त साठा :- 6.035 दलघमी

मागील वर्षाची टक्केवारी:- 100%

मागील वर्षाचे पर्जन्यमान:- 765 मीमी

माहिती देणाऱ्याचे नाव :- आर. एन. दरबस्तवार

(जुई मध्यम प्रकल्प दानापूर.

 मो. 9423546743)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!