जाफराबाद तालुका

किर्तनकार, प्रवचनकार यांना मानधन देण्याची वारकरी परिषदेची मागणी


टेंभुर्णी/ सुनील जोशी

images (60)
images (60)

कलावंतांना मानधन देण्याची घोषणा राज्य शासनाने केली असून किर्तनकार, प्रवचनकार यांचाही कलावंतांमध्ये समावेश करून मानधन देण्याची मागणी जाफराबाद तालुका वारकरी परिषदेने केली आहे.

याविषयी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि प्रवचन, किर्तनाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतो. गत दिड वर्षांपासून कोरोनामुळे हरिनाम सप्ताह, किर्तन, प्रवचन सर्व बंद असल्याने सांप्रदायिक मंडळी आर्थिक विवंचनेत आहेत.सर्व किर्तनकार, प्रवचनकार यांचा समावेश कलावंतांमध्ये करून त्यांना ही आर्थिक मदत करण्याची, मानधन सुरू करण्याची मागणी तालुकाध्यक्ष मार्तंड महाराज फदाट, अमोल महाराज देव्हडे, विलास महाराज लोखंडे, कचरू महाराज लोखंडे, सांडू महाराज खंदाडे, शिवाजी महाराज लोखंडे, मधुकर महाराज लोखंडे, जगन राठोड यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!