श्रावन मासानिमीत्त चालु असलेल्या नामजप हरिपाठाची दहीहंडी फोडुन सांगता
मधुकर सहाने : भोकरदन
गेल्या महिन्याभरापासुन भोकरदन शहरात रोकडा हनुमान संस्थानच्या वतीने विवीध सांस्कृतीक व नामजप कार्यक्रम राबवण्यात आले,यात मुख्यता दररोज नित्याने सध्याकाळी हरीपाठ, भजन तसेच भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या भक्तीमय कार्यक्रमाने रोकडा हनुमान परीसर भक्तीमय झाला होता व परीसरातील सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.काल सकाळी या सर्व कार्यक्रमाची दहीहंडी फोडुन व काल्याच्या प्रसादाने सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी स्वर गंध संगीत क्लासेसचे संचालक शंकर गुरुजी साबळे,संतोष महाराज पवार,गोरक्षनाथ महाराज सोनवने,प्रभु महाराज तळेकर,बालाजी महाराज उबळे,संदिप महाराज व स्वर गंध संगीत क्लासेसचे सर्व विद्यार्थी यांचे संस्थानच्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजाभाऊ देशमुख,सतिषबापु रोकडे,राहुल देशमुख,रमेश देशमुख,प्रितम देशमुख आदिंची उपस्थिती होती…