जाफराबाद तालुका

टेंभुर्णीच्या भूमीपुत्राचा टेंभुर्णीत सत्कार. डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचा टेंभुर्णी सत्कार.

टेंभुर्णी :

images (60)
images (60)

टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागात राहून जागतिक पातळीवर लोककलेला घेऊन जाणारे डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचा टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात शनिवारी सत्कार करण्यात आला मुंबई लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गणेश चंदनशिवे मूळचे टेंभुर्णी येथील रहिवासी असून त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे शनिवारी ते टेंभुर्णी येथे आले असता गावकऱ्यांच्या वतीने पत्रकार संघ मानव सेवा मंडळ व महात्मा फुले वाचनालय यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला श्री चंदनशिवे यांना नुकताच विठ्ठलराव विखे पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल गावकर यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला होता

गावाची ओढ असते या मुळे आपण नेहमी गावाकडे अधून मधून येत असतो जिवाभावाची माणसं गावाकडे भेटल्यानंतर मन भारावून जाते असे प्रतिपादन  चंदनशिवे यांनी केले लोककलेच्या माध्यमातून संपूर्ण जगात नाव लौकिक प्राप्त झालेले असले तरी मातृभूमी चि ओढ कायम असते असेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स पो नि रविंद ठाकरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच गौतम मस्के तंटामुक्ती अध्यक विष्णू जमधडे पी जी तांबेकर प्राचार्य भास्कर चेके उप प्राचार्य नंदकुमार काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख यांनी केले कार्यक्रमांमध्ये व्यापारी महासंघाचे जिल्हा सदस्य अलकेश सोमानी पी जी तांबेकर विष्णू जमधडे शेख साबेर गौतम मस्के श्री रविंद्र ठाकरे सावता तिडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात नसीम शेख यांनी  चंदनशिवे सरांचा कार्याचा गौरव करीत त्यांचा जीवनपट उकलून दाखविला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब आंभोरे यांनी केले मानव सेवा मंडळाचे स्थानिक अध्यक्ष संजय राऊत यांनी आभार मानले कार्यक्रमाला बालाजी शेवाळे दिनकर ससाने शैली प्रकाश वाघमारे गौतम चंदनशिवे अशोक पाबळे गोविंदपाल इंगळे अभिजीत आंभोरे भिकन खा पठाण राम गुरव शेख हमीद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!