भोकरदन तालुका
स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणी साठी वैभव ची निवड
मधुकर सहाने : भोकरदन
औरंगाबाद येथे होणाऱ्या सीनियर राज्य अजिंक्य पद स्पर्धा करिता वैभव नारायण जीवरग याची द्वितीय क्रमांक साठी निवड झाली आहे ही स्पर्धा 12 सप्टेंबर रोजी जालना येथे आयोजित केली होती ,वैभव याची 18 तारखेला होणाऱ्या राज्य स्पर्धा करिता निवड झाली असून भिष्मा आर्चरी असोसिएशन, जालना, कै.भगवानराव पा. इंगळे आर्चरी असोसिएशन भोकरदन पदाधिकारी व तसेच पालक वर्ग खेळाडू मधून अभिनंदन करण्यात येत आहे.
वैभव याला राष्ट्रीय प्रशिक्षक विशाल पा. इंगळे यांचे मार्गदर्शन लाभत असून वैभव नियमित सराव करीत आहे.