परतूर तालुका

लोणीकरांच्या दणक्यानंतर नुकसानीच्या पंचनाम्यांना महसूल विभागाने केली सुरुवात

images (60)
images (60)

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपल्याने तालुक्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नदीच्या, ओढ्याच्या काठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे तर काही भागात गुडघाभर पाण्यात शेतातील पिके बुडाली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या तर काही घरांची पडझड झाली.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासानाला चांगलेच धारेवर धरले होते. निवासी जिल्हाधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोणीकरांनी खडसावल्यानंतर स्थानिक महसूल प्रशासन देखील जागे झाले आहे. परतूर तालुक्यातील दैठणा बु.भागात जावून सोमवारी महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने पाहणी करून पंचमाने करण्यास सुरूवात झाली.

तालुक्यातील दैठणा बु. शिवारात नुकसानी पंचनामे करण्यासाठी यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, महसूल विभागाचे तलाठी अशोक यादव, कृषी सहायक पी.एच.वीजापुरे, ग्रामसेवक जगन राठोड,भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंत बेरगुडे, शामराव चव्हाण, संतोष रेपे, यांच्यासह बाधित शेतकरी व गावकरी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!