अंबड तालुकाजालना क्राईम

दुर्दैवी घटना: अंबडमध्ये तिने प्रियकराच्या मदतीने केला सहा वर्षाच्या मुलाचा खून

images (60)
images (60)

अंबड – प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा मुलाचा खूनकेल्याची दुर्दैवी घटना अंबड येथे घडली.
प्रियकराच्या मदतीने या महिलेने मुलाच्या तोंडात बोळे कोंबून जीव घेतला आणि मुलगा हरवल्याचा बनाव केला. या संतापजनक प्रकारामुळे जालना जिल्हा पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.

परवा बदनापूर तालुक्यात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला होता. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी ला ताब्यात घेतले आहे. अंबड तालुक्यातील वडगाव येथील २२ वर्षीय विवाहित महिला तिच्या भावाच्या उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा देखील होता.

भावाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने ही महिला दवाखान्याच्या बाहेर पडली, परंतु सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचा बहाना करून तिने उभा असलेल्या मानसाला औषध घेऊन येइ पर्यत संभाळन्यास सांगितले व काही अडचण असल्यास मोबाईल क्रमांक लिहून दिला होता.

थोड्याच वेळात ती महिला औषध घेऊन आली तोपर्यंत हे दोघेही गायब झाले होते. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बनाव करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि बुधवारी संध्याकाळी आदित्य चा मृतदेह घनसांवगी रस्त्यावरील एका नाल्याच्या बाजूला असल्याचे पोलिसांना कळले.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. दरम्यान महिलेजवळ तरुणाने दिलेल्या नंबरच्या आधारे पोलिसांनी हा तपास पूर्ण केला आहे.

प्रियकराच्या मदतीनें या विवाहित प्रेयसीने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा जीव घेतला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये कलम 302 अन्वये खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पूढील तपास पोलीस करीत आहेत

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस निरीक्षक करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!